कोणी तरी कोणीतरी अफवा पसरवत आहे...

नगर : प्रवेश असता तर कार्यकर्त्यांसोबत आलो असतो, कोणीतरी अफवा पसरवत आहे. मला माझ्या नेतृत्वाने सांगितलं तर नगरच्या जागांसाठी काम करेल, असे आमदार नीलेश लंके म्हणाले.


जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके चर्चेत आले आहेत. आमदार निलेश लंके सध्या अजित पवार यांच्या गटात सहभागी असून ते महायुतीचा एक भाग आहेत.

पक्षप्रवेशाविषयी अजून काहीच नाही. मोठ्या साहेबांनी (शरद पवार यांनी ) याबाबत कुठलं तथ्य नसल्याचे लंके यांनी सांगितले आहे. 

मी आता दादांसोबत आहे.” तसेच लंके यांनी अमोल कोल्हे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हटलेत की, “माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे. स्पर्धा असो किंवा नसो स्पर्धेची तयारी करत असतो. मी खेळ खेळणारा माणूस आहे, मी नाश्ता करण्यासाठी गेस्ट हाऊसला आलो होतो.

त्यावेळी कोल्हे भेटले. अमोल कोल्हे यांचे महानाट्य झालं त्याच्यानंतर आमची चर्चा नव्हती त्यामुळे भेटलो,” असे लंके यांनी यावेळी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post