पारनेर : लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही, असे आमदार निलेश लंके यांनी संगितले.
लंके म्हणाले की, अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात.
राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही.”, असे लंके म्हणाले.
निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. दरम्यान, नगर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर भाष्य केले आहे.
निलेश लंके म्हणाले, मी कार्यकर्त्या आहे, मला लोकसंपर्क वाढवण्याचा छंद आहे. मित्र परिवार जपण्याचा छंद आहे. याचा अर्थ असा नाही की, मला निवडणूक लढवायची आहे.
मी जिल्ह्याच्या बाहेर देखील काही कार्यक्रमांना जात असतो. लोकसभा निवडणूक लढणार का ? या प्रश्नावर निलेश लंके यांनी राजकारण कधीही आणि केव्हाही पलटू शकतं. राजकारणात काही गोष्टी घडण्याअगोदरच त्याबाबत बोलण मला योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले.
Post a Comment