विकासाच्या वल्गना करणाऱ्या विखे यांनी पारनेरसाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही

पारनेर : विकासाच्या वल्गना करणाऱ्या खासदार सुजय विखे यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही, असा आरोप आमदार नीलेश लंके यांनी केला.


शहरातील विविध विकास कामांसाठी आपण आत्तापर्यंत तब्बल १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला.शहराच्या इतिहासात आत्तापर्यंत आलेल्या निधीच्या शंभर पट निधी आपण आणल्याचा दावा त्यांनी केला.

शहरात झालेल्या कामांची व मंजूर कामांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. शहरातील ३८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते सोमवारी रात्री झाले.

सोमवारी दिवसभर आमदार लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत जोरदार चर्चा होती.त्यासंदर्भात बोलणे मात्र त्यांनी टाळले.

बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी  लंके, माजी सभापती सुदाम पवार,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे अर्जुन भालेकर,शिक्षक नेते रा. या. औटी, नगराध्यक्ष नितीन अडसूळ,पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते, मुख्याधिकारी विनय शिपाई, गंगाराम बेलकर, निवृत्त पोलीस उपायुक्त राम पठारे, नंदकुमार देशमुख,विजय डोळ,बाळासाहेब नगरे, श्रीकांत चौरे ,सुवर्णा धाडगे, उमा बोरूडे,वैजयंता मते, सुरेखा भालेकर, दिपाली औटी विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले की, विविध सुविधांच्या अभावामुळे विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे शहराचा विकास खुंटला आहे.ही बाब लक्षात आल्याने आपण नगर पंचायतीच्या निवडणुकीत शाश्वत पाणी पुरवठा योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते.मुळा धरणातून प्रस्तावित असलेल्या ७५ कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. 

पारनेर बसस्थानकासाठी १८ कोटी रुपये तर उपजिल्हा रुग्णालयासाठी ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शहराच्या सर्व बाजूंच्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. ८ कोटी रुपये खर्चाच्या बगिच्याला तसेच दशक्रिया विधी घाटाच्या सुशोभीकरणाला मंजुरी मिळाली असल्याचे आमदार लंके म्हणाले. 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावेळी आयोजित करण्यात आलेल्या 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील अथवा तालुक्यातील विकास कामांच्या प्रस्तावाची प्रत्येक फाईल जिल्हास्तरावर अडवली जाते.

त्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो.असा आरोप आमदार लंके यांनी केला.त्यांचा रोख पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर होता.पाणीपुरवठा योजनेतही अनेक अडथळे उभे करण्यात आले.सर्व अडथळे पार करण्यात बराच कालावधी गेला.अन्यथा आत्तापर्यंत या योजनेचे काम सुरू झाले असते असे आमदार लंके म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post