मुंबई ः राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मुंबईतील बैठकीत जिल्ह्यातील एका नेत्याची महिला नेत्याने चांगलीच झाडाझडती घेतली. लग्न आपले आहे... घरच्या माणसांना आमंत्रणाची गरज नाही. या पुढे निरोप नसला तरी बैठकीला यावेच लागेल, अशा शब्दात त्या नेत्याला समज देण्यात आली.
मुंबईतील महिला विकास मंडळात अहमदनगरमधील प्रमुख पदाधिकारी, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बैठक बोलविली होती. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौर्यात होते. त्यांच्या दौैर्यात पवार सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित बैठक पार पडली.
या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ, रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, बाळासाहेब नहाटा, कपिल पवार, संपत बारस्कर, राजेंद्र गुंड, संजय कोळगे आदी उपस्थित होते.
या वेळी महिला संघटनेच्या पदाधिकारी निवडी झालेल्या नसल्याची तक्रार जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याने केली. यावरून जिल्हाध्यक्षांची व जेष्ठ नेत्यांची शाब्दीक खडाजंगी झाली. त्यावेळी या बैठकीला उपस्थित असलेल्या महिला नेत्यांनी त्या वरिष्ठ नेत्यांची कानउघडणी केली. निवडी होतील, काही त्याला वेळही लागतो. तुम्हाला मुंबईतील बैठकांचे निमंत्रण कशाला हवे आहे. घरच्या लग्नाचे घरातली व्यक्तीला पत्रिका कोणी देते का असा प्रश्न त्यांनी करून संबंधित नेत्याला समज दिली.
Post a Comment