राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढविणार....

मुंबई :  अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. 


पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. 

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये अरुणाचल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लिखा साया व पक्षाच्या पदाधिकाऱ्य़ांची एक बैठक पार पडली. याच बैठकीत सर्व 60 जागांवरील स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

भाजपसोबत निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी केली जाणार नाही. निवडणुकीनंतर गरज पडल्यास भाजपसोबत आघाडी केली जाईल, असे याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post