सामान्य जनतेच्या आरोग्य समस्यासाठी सर्वरोग निदान शिबिर कल्पक उपक्रम....

चांदा : गावागावात सर्व रोग निदान शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य विषयक समस्या सोडवणे. हा एक कल्पक उपक्रम असून याला आणखी विस्तृत स्वरूप देण्यासाठी गडाख परिवार नेहमी प्रयत्नशील राहील. असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी व्यक्त केले.


येथील डॉ. विकास दहातोंडे यांच्या शमा क्लिनिकमध्ये आयोजित सर्व रोग निदान शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री गडाख बोलत होते. उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ चांदा . शमा क्लिनिक चांदा. यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार रोजी भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यामध्ये नगर येथील यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, सुरभी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या टिमचा सहभाग होता .सकाळी रामायणाचार्य ह भ प पंडित महाराज भुतेकर भागवताचार्य ह भ प देविदास महाराज आडभाई व गावातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून शिबिराला सुरुवात झाली.


यावेळी श्री गडाख पुढे म्हणाले की जेष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख ,प्रशांत गडाख ,सुनीताताई गडाख हे तालुक्यात समाज जोडण्याचे काम अखंडपणे करत आहेत .निवडणुकीपुरते राजकारण ठेवून पूर्णवेळ समाजकारणासाठी द्यावा. अशी सूचना त्यांनीच दिली असल्याने आपण तालुक्यातील समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अविरत काम करत आहोत. 

तालुक्यातील जवळपास १३० रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत ५० लाखापेक्षा जास्त मदत केली आहे .  तालुक्यातून बाहेरील दवाखान्यामध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटची संबंधित दवाखान्याच्या प्रमुखांशी रोज विचारपूस केली जात आहे. त्यांना हवी ती मदत देण्यासाठी आपण सतत संर्पकात असतो. 


हे सर्व काम सेवाभावी वृत्तीने समाजासाठी आपण करतो असेही ते म्हणाले .यावेळी ह भ प पंडित महाराज भुतेकर, ह भ प देविदास महाराज आडभाई, माजी सभापती कारभारी जावळे, यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिबिराच्या आयोजकांचे आभार मानले.


या शिबिरात जवळपास 261 रुग्णांची तपासणी करून आवश्यकते उपचार करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अरुण सोनकर यांनी तर आभार डॉक्टर विकास दातोंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post