नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोणात लढत होणार याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातील दावा भाजपने सोडला सोडला आहे. त्यामुळे आगामी लढत घड्याळ विरुद्ध तुतारीमध्ये होणार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान भाजपाचे खासदार आहेत. भाजपअंतर्गत ही जागा मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आगामी काळातया जागेवरील निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
तसेच ही जागा अजित पवार गटाने आपल्याकडे मागितले आहे. त्यामुळे या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा राहील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवार व शरद पवार यांच्या गटातही लढत होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघातील लढतीकडे राहणार आहे. दोन्ही गटाला ही जागा प्रतिष्ठेची राहणार आहे. त्यामुळे या जागेवर दोन्ही गटाला ही तुल्यबळ असेच उमेदवार द्यावे लागणार आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून कोण उमेदवार उभा राहील व शरद पवार गटातून कोण उमेदवार उभा राहील याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची मतदारसंघात उमेदवार म्हणून घेतली जात आहेत.
निलेश लंके, प्रताप ढाकणे, रोहित पवार, संग्राम जगताप , चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, जगन्नाथ भोर आदी नेत्यांची नावे चर्चेत आहे. यातील काही नावे दोन्ही पवार गटात चर्चेत आहेत.
Post a Comment