नगर : अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देण्यात येणार सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रथम पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्यास मिळाला आहे. तर द्वितीय पुरस्कार जिल्हा जळगाव व तृतीय पुरस्कार धुळे जिल्ह्यास जाहीर झाला आहे.
राज्य पुरस्कृत जिल्हा सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात प्रथम पुरस्कार जिल्हा अहमदनगर, द्वितीय पुरस्कार जिल्हा जळगाव तर तृतीय पुरस्कार जिल्हा नंदूरबार.
राज्य पुरस्कृत तालुका सर्वोत्कृष्ट अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार जामखेड तालुका, द्वितीय पुरस्कार शेवगाव तालुका तर तृतीय पुरस्कार नेवासा.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतः प्रथम पुरस्कार अरणगाव ग्रामपंचायत (ता. जामखेड, जि. अहमदनगर), द्वितीय पुरस्कार गोलेगाव ग्रामपंचायत (ता. शेवगाव जि. अहमदनगर), नागापूर ग्रामपंचायत (ता. नांदगाव जि. नाशिक) ही सर्व पुरस्काराचे वितरण नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे १२ मार्च २०२४ ला नियोजन सभागृहात होणार आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरीय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यास प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका व तृतीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यास मिळाला आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट पुरस्कार ग्रामपंचायती याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मालेवाडी ग्रामपंचायत (ता. पाथर्डी), नाशिक जिल्ह्यात द्वितीय पुरस्कार कुशेगाव ग्रामपंचायत (ता. ईगतपुरी), तृतीय पुरस्कार नागोसली (ता. ईगतपुरी, जि. नाशिक).
पंतप्रधान आवास योजना विभागात सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुलमध्ये प्रथम पुरस्कार हनुमंत खेडे ग्रामपंचायत (ता. धरणगाव, जि. जळगाव), द्वितीय पुरस्कार भोलाणे ग्रामपंचायत (ता. पारोळा, जि. जळगाव), तृतीय पुरस्कार सुपे ग्रामपंचायत (ता. कर्जत, जि. अहमदनगर).
पंतप्रधान आवास योजना विभागात सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल (हाऊसिंग अपार्टमेंट) यामध्ये प्रथम पुरस्कार उपखेड ग्रामपंचायत (ता. चाळीसगाव जि. जळगाव), द्वितीय पुरस्कार वागदरी ग्रामपंचायत (ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार कोळपिंपरी ग्रामपंचायत (ता. पारोळा, जि. जळगाव).
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण शासकीय जागा उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके : प्रथम पुरस्कार तालुका जामनेर (जि. जळगाव), द्वितीय पुरस्कार तालुका निफाड (जि. नाशिक), तृतीय पुरस्कार तालुका नांदगाव (जि. नाशिक).
Post a Comment