पुण्यातील कात्रज भागातील प्राणी संग्रहालयाच्या पिंजर्यातून बिबट्या पळाला.....

पुणे : पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून एक बिबट्या पळाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पळालेल्या बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

हा बिबट्या मानवी वस्तीत शिरू नये, यासाठी प्रयत्न सुरू त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. परंतु बिबट्या पिंजर्यात अडकला नाही.

पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र मजबूत पिंजऱ्यातून बिबट्याबाहेर आल्याने खळबळ उडाली आहे

. पिंजर्यांच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post