नगर : अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सर्वांसाठीच आनंदोत्सव करण्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी दिली.
वाकचौरे म्हणाले की दीन-दलित, वाटेचे वाटसरु या सर्वांसाठी अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारवा,घाट किंवा इतरही कामे बघितली तर दुरदृष्टीच्या या नेतृत्वाचा बहूमान ख-या अर्थाने शासनाने केला.बांधकामाचा उत्तमोत्तम आणि चिरस्थायी वारसा महाराष्ट्राला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी दिला.
अहिल्यादेवी एका विशिष्ट धर्म किंवा जातीच्या नव्हत्या.त्या मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानणा-या होत्या हे त्यांच्या कार्यावरुन लक्षात येते.नामकरणामुळे सर्व धर्मिय आणि सर्वच जातीबांधवांना आनंद झाला आहे, असे ते म्हणाले.
.jpeg)
Post a Comment