नेवासा गावाचे नामांतरण ज्ञानेश्वरनगर करा...

नेवासा : नेवासा तालुक्याच नाव ज्ञानेश्वर नगर करावे व शहरात मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी आम् आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष संदीप आलवने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झाले आहे. या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचंही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशीव असं करण्यात आले आहे. 

त्यापाठोपाठ अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. ती पूर्ण झालेली आहे.

नेवासा तालुक्याच नाव ज्ञानेश्वर नगर करावे व शहरात मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी आम् आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष संदीप आलवने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.

आता यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या या दोन्ही मागण्या आहेत. याकडे जाणीवपू्र्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या मागणीसाठी आम्ही आम् आदमी पक्षातर्फे लढा उभारणार असल्याचे आलवणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवाशाच्या भूमीला ज्ञानेश्वरनगर हे नाव द्यावे अशी सर्वांचीच मागणी आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आलवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

ही मागणी त्वरीत पूर्ण होऊ शकते यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने असा ठराव करून तो शासनास पाठवणे गरजेचे नाही तसेचनगर पंचायत ने ही तसा ठराव करून तो शासनाला तातडीने पाठवा अशी अपेक्षा आलवणे यांनी व्यक्त केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post