नगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला.
लिलावासाठी एकूण 89057 गोण्या कांद्याची आवक झाली. आवक काहीशी वाढली असली तरी भाव पूर्वीप्रमाणे खाली आले आहेत.
यात प्रथम प्रतीच्या कांद्यास 1600 ते 2000 रुपये, द्वितीय प्रतीस 1000 ते 1600, तृतीय प्रतीस 600 ते 1000, चतुर्थ प्रतीस 150 ते 600 रुपये भाव मिळाला.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment