नीलेश लंके विजयी होतील....

नगर : आमदार निलेश लंके उमेदवारीसाठी तयार आहोत. त्यांची एन्ट्री जोरदार करायची आहे. निलेश लंके उभे राहतील व विजयी होतील, असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.


निलेश लंके उमेदवारीसाठी तयार आहोत. त्यांची एन्ट्री जोरदार करायची आहे. निलेश लंके उभे राहतील आणि विजयी होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केले. 

तसेच सांगलीच्या जागेवरबही त्यांनी दावा सांगितला आहे. फक्त महाविकास आघाडीत नाही तर महायुतीतही तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा… तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. 

आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. चर्चेतून प्रश्न मिटतील. पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत, असे थोरातांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post