मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते व अजित पवार यांचे कट्टर विरोधक यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पक्की असल्याचे जाहीर केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
एवढेच नाही तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि वेळही जाहीर केली. मला एकनाथ शिंदे यांनी पक्षातून काढून टाकले तरी मी निवडणूक लढविणारच असा पवित्रा घेतल्यानंतर आता अजित पवार गटही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभेत असहकार करण्याची भाषा वापरली होती. मात्र आता मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याही पुढे जाऊन थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Post a Comment