शेवगाव : खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील ‘मै हु डॉन..’ या गाण्यावर ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडला.
शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांनी उत्सवमूर्ती महिला भगिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित असंख्य महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमात लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अनेक महिला या आकर्षक बक्षिसांच्या मानकरी देखील ठरल्या. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने उपस्थितांची मने जिंकली.
तसेच अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आपल्या नृत्यातून प्रेक्षकांवर भुरळ घातली. यासोबतच महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल, रोहित माने आणि शिवाजी परब यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांच्या मनात स्थान निर्माण केले.
अतिशय मनोरंजनात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील ‘मै हु डॉन..’ या गाण्यावर ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.
Post a Comment