शिर्डीकरांमुळेच मी खासदार....दोन महिन्यानंतर मी इकडेच येईल......

राहता : शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मात्र, तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच (शिर्डी) येईल,असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.


राहता येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

सुजय विखे यांनी म्हणाले की शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मात्र, तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच (शिर्डी) येईल. काळजी करु नका, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले. 

सुजय विखे-पाटील यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुजय विखे यांची ही बदललेली भाषा म्हणजे त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही.


याबद्दल कुणकुण लागल्याचा परिणाम आहे किंवा त्यांना यंदाच्या लोकसभेला निवडून येण्याबाबत साशंकता वाटत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post