राहाता : गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विखे पाटलांचा पॅनलचा दारूण पराभव झाल्यानंतर स्वपक्षात सुरू झालेली विखे - कोल्हे लढाई आता टोकाची झाली आहे. शासकीय निधी वाटपात पालकमंत्री विखे पाटील दुजाभाव करत असल्याचा आरोप करत भाजपच्या विवेक कोल्हेंनी आज शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज मोठा असा मोर्चा शिर्डी मध्ये काढण्यात आला. त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळाली.
पालकमंत्री विखे पाटील व भाजपचे कोल्हे यांचा राजकीय वाद आता विकोपाला गेलेला दिसत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हेंची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतला निधी देत नसल्याचा आरोप करत आज विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्री विखे पाटील व आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राजकीय दृष्टिकोन ठेवून निधी देण्यास दुजाभाव होत असल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे.
कोपरगाव व राहाता तालुक्यात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची शेवटची संधी तुम्हाला देत असून जर तुमच्यात सुधारणा झाली नाही तर जनतेच्या हितासाठी विखे पाटलांच्या विरोधात राहाता मतदार संघात तळ ठोकणार असल्याचा इशारा विवेक कोल्हे यांनी दिला आहे.
विखे पाटील आणि कोल्हेंचे राजकीय वैर आता वाढताना दिसत असून थेट रस्त्यावरची लढाई बघायला मिळत आहे. आगामी काळात है वैर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका विखे यांना बसण्याची दाट शक्यता आहे.
Post a Comment