नेवासा ः नेवासा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवार कोण राहणार याविषयी नेवासा तालुक्यात चर्चा सुरु आहे. काहींनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असे कार्यकर्त्यांना सांगण्यास सुरवात केलेली आहे. परंतु दोघात तिसरा अन् आता सर्व काही विसरा अशीच चर्चा सध्या सुरु झालेली आहे.
नेवासा तालुक्यातून विधानसभेसाठी भाजपाकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह इतर काही तालुक्यातील नेत्यांची नावे चर्चेत येत आहे. काहींना तर तालुक्यात आमदार म्हणूनच संबोधले जात आहे.
भाजपमध्ये सध्या नेवासा तालुक्यातून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी काहींनी प्रयत्नही केलेले आहे. मात्र ते प्रयत्न फेल ठरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यात आता दोघात तिसरा येणार असून त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
लंघे व मुरकुटे या दोघांध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले दाखल होणार आहे. त्यांचेच पारडे सध्या तालुक्यात जड राहणार असल्याने त्यांचीच उमेदवारी फायनल समजली जात आहे. दोघात तिसरा अन् आता सर्वांनी विसरा अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
बाहेरचा कोणी माणूस आणून उभा करा, म्हणजे आम्ही त्यांचा प्रचार करू. परंतु जर पक्षा बाळासाहेबमुरकुटे यांना उमेदवारी पक्षाने दिली तर आम्ही त्याविरोधात आपला आवाज वाढवू, असेही ते बोल आहेत
Post a Comment