नगर : आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमातून निलेश लंके घराघरात पोहोचलेले आहेत. या महनट्याचे नियोजन उत्कृष्ट पणे केलेले आहे. त्यांच्या या नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित केले होते. या महानाट्य मंचावर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून लंके यांचे कौतुक केले.
यावरून लंकेच हे आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राहतील असे स्पष्ट होत आहे. लंके या़ंच्या नावाला महायुतीत विरोध होणार नसल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमळी देशात सुरू झालेली आहे. भाजपकडून पहिली उमेदवारीची यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जागा ही भाजप अजित पवार गटासाठी सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच लंके यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व नेतेमंडळी ठामपणे उभे असल्याचे य कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
Post a Comment