आरक्षण फसवे आहे, ते कोर्टात टिकणार नाही

नांदेड : मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.

सगेसोयगरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


यासाठी त्यांनी महाराष्ट्रात संवाद दौरा सुरू केला आहे. सोमवारी (ता. चार) रात्री नांदेड येथे मराठा बांधवाना संबोधित करताना जरांगेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा दिला आहे.

कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली त्याचा कार्यक्रम करतोच मी…’ असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर उत्तर देताना, मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.

सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले. सगेसोयऱ्यांचा शब्द देऊन अधिसूचना काढली, पण त्याचे कायद्यात रुपांतर केले नाही. विशेष अधिवेशनात मराठा नेत्यांनी यावर एकही शब्द काढला नाही. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण फसवे आहे, ते कोर्टात टिकणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post