मुंबई ः शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. गडाख पक्ष बदलणार असल्याची चर्चा यामुळे पुढे येत आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती प्रसिद्धीसाठी देण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
स्टार प्रचारक म्हणून गडाख यांचे नावही येणे गरजेचे होते. मात्र ते आलेले नाही. त्यामुळे या चर्चा सुरु झालेल्या आहे. काही दिवसांपूर्वीच शंकरराव गडाख यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चा सध्या होत आहे.
Post a Comment