विखे पिता-पुत्रांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला...

पारनेर ः विखे पाटील पिता-पुत्रांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावले, असा आरोप आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. लंके यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या वेळी लंके यांच्याबरोबर अहमदनगर लोकसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

लंके म्हणाले, या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावूक झाले होते. 

शरद पवार यांच्याबद्दल लंके म्हणाले, मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितले लोकसभा लढवावी लागेल. त्यावर मी लगेच हो म्हणालो. आता शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार आहे, असेही लंके यांनी जाहीर केले.

मेळाव्यात लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. लंके म्हणाले, त्यांचे पीए स्वत:चे पीए ठेवतात आणि पैसे उकळतात. पाच वर्षे खासदार आणि राज्यातील मंत्रिपद असूनही त्यांनी विकास कामे केले नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post