नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. याआधी ईडीकडून त्यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर लगेचच ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते.
आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचू दिले जात नाहीये. पोलिसांनी आधीच निवासस्थानापासून दूरवर बॅरिकेड्स लावले आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आज ईडीचे पथक दहावे समन्स घेऊन त्यांच्या घरी दाखल झाली होती. यावेळी त्यांच्यी घरी झडती देखील घेण्यात आली आहे. चौकशीदरम्यान केजरीवाल यांचा फोन देखील ईडीने ताब्यात घेतला होता.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती.
केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आता यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे. आप पक्षाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रात्रीच या प्रकरणात सुनावणी व्हावी अशी आपची मागणी आहे.
Post a Comment