राज ठाकरे यांना एनडीएमध्ये घेण्याची गरज नाही...

नवी दिल्ली ः राज ठाकरे यांना घेण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.  राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत बोलताना, त्यांनी हे मत मांडले.

रामदास आठवले यांनी म्हटलं की, राज ठाकरे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. वास्तविक आमची भूमिका ही आहे की राज ठाकरे यांना सोबत घेण्याची गरज नाही. 

राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. पण राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. मात्र ते आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post