लातूर ः ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. काॅंग्रेस गटात पुन्हा एकदा भूकंप आलेला आहे. भूकंपाच्या धक्क्याने काॅंग्रेसमधील अनेकजण भाजपमध्ये जात आहे.
काँग्रेसचे बडे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
निवडणूक काळात भाजप अधिक मजबुतीने उभा राहताना दिसत आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने भाजप लातूरमध्ये बळकट झाली आहे. परंतु या सर्वांचा प्रवेश सर्वसामान्यांना आवडलेला नाही. त्यामुळे आगामी काळात त्याचे परिणाम संबंधितांना भोगावे लागणार आहे.
Post a Comment