घोडेगावात कांद्याच्या भावात एव्हढा भाव

घोडेगाव ः घोडेगाव उपबाजार समितीत कांद्याचे आज लिलाव झाले. यामध्ये कांद्याला 1800 प्रतिक्विंटल भाव मिळाला.


येथील उपबाजार समितीत 47 वाहनातून कांद्याच्या 8433 गोण्यांची आवक झाली.  नेवासा तालुक्यासह नगर, राहुरी, शेवगाव, वैजापूर आदी तालुक्यातील कांद्याची आवक झाली. यामध्ये कांद्याला आज चांगला भाव मिळाला आहे. 

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः  एक दोन लाॅट ः 1700 ते 1800, मोठा कांदा 1500 ते 1600, मुक्कल भारी 1300 ते 1400, गोल्टा 900 ते 1100, गोल्टी 700 ते 800, हल्का डॅमेज जोड 200 ते 400 रुपये कांद्याला प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींसह संचालक मंडळ व सचिवांतर्फे करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post