नगर : हॉस्पिटल माझे आहे, तुझा काही संबंध नाही, असे म्हणत हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. १४) नगर मनमाड रोडवरील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे घडली.
या प्रकरणी चार जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश सर्जेराव फसले (रा. ओम रेसिडेन्सी, तपोवन रोड), गणेश घोरपडे, श्रीकांत घोरपडे, अविनाश चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही)व इतर एक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. अनिल आठरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे नगर- मनमाड रोडवर हॉस्पिटल आहे. गुरुवारी दुपारी वरील आरोपी हॉस्पिटलमध्ये आले. हे हॉस्पिटल माझे आहे, तुझा काही संबंध नाही. हॉस्पिटलव मशनरीदेखील माझीच आहे, असे म्हणत आरोपीने डॉ. अनिल आठरे यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतरही आरोपींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन गोंधळ घातल्याने आठरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Post a Comment