सातारा : शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे अशी आग्रही मागणी होत आहे, असे शरद पवार यांननी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले.
शरद पवार सातारा दौऱ्यावर असून सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातो. त्यातच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे अशी आग्रही मागणी होत आहे.
श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. मी मुद्दाम साताऱ्यात येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. तीन पक्ष मिळून यंदा एकत्र निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झालं आहे. एकापेक्षा जास्त जण साताऱ्यातून लढण्यास उत्सुक आहेत. काही जणांनी मी निवडणूक लढवावी, असाही आग्रह धरला.’ असं शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.
सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वतः शरद पवार निवडणुकीस उभे राहिले तर येथील सर्वच राजकीय समीकरणे बदलून जातील, असेही कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात आहे.
Post a Comment