नगर ः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडलेले आहे. या खिंडारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवार गटाची ताकद काही अंशी कमी झालेली आहे.
आमदार नीलेश लंके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यामध्ये त्यांची अजित पवार गटाकडून असलेली आमदारकी हा मोठा अडथळा होता. त्यामुळे पुढील निर्णय रखडला होता अखेर लंके यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला.
राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली आहे. लंके यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटाकडून अद्याप त्यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment