राहुरी ः भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली असून त्यांची ग्रीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी अशी खोचक टीका आमदार नीलेश लंके यांनी केली.
राहुरी तालुक्याच्या दौर्यावर आमदार नीलेश लंके होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केला. लंके म्हणाले की, मी खासदार झाल्यानंतर संसदेमध्ये साखर डाळ वाटल्याबद्दल विखे प्रतापत्रांची ग्रिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी अशी आग्रही मागणी करणार असल्याचेही आमदार निलेश लंके यांनी राहुरी दौऱ्या सांगितले.
तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून विखे पिता- पुत्र सत्तेत असताना त्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाही त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी विखे पाटील पिता पुत्राने महसूल विभगात भ्रष्टाचार करून डाळ साखर वाटली असल्याचा हल्लाबोल निलेश लंके यांनी राहुरी येथील जनसंवाद यात्रेदरम्यान केला आहे. तर त्यांनी नगर दक्षिण मध्ये जी डाळ साखर वाटली आहे
ती भ्रष्टाचाराचे असल्याची माहिती समजली आहे त्यामुळे लवकरच याची चौकशी लावणार असल्याचीही वक्तव्य राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये निलेश लंके यांनी केले आहे.चे कौतुक तुम्ही सांगू नका अशी थेट आव्हान निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना दिले आहे
Post a Comment