नगर ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु झालेली आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून खासदार डाॅ. सुजय विखे व महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके हे उमेदवार आहेत. या दोघांचे समर्थक श्रीगोंदे वगळता सर्वच तालुक्यात प्रचार करीत आहेत. मात्र श्रीगोंदेकरांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली आहे. या भूमिकेकडे सर्वांचे लागले आहे.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे.पारनेर, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका, नगर शहरासह मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये व गावांमध्ये दोन्ही गटाकडून प्रचार केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे. परंतु या मतदारसंघातील श्रीगोंदे तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या शांत दिसून येत आहे. तालुक्यातील नेते मंडळींनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
श्रीगोंदेकरांचा कल नेमका कोणाच्या बाजुने राहणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कामात नेहमीच श्रीगोंदेकरांवर अन्याय झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे विखे गटावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही नाराजी आता विखे पाटील कशी दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच भाजपसह मित्र पक्षातील नेते मंडळींकडून म्हणाव तसा प्रचाराचा जोर धरलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यात सध्या वेगळीच चर्चा सुरु झालेली आहे.
लंके यांचे तालुक्यात काही अंशी संपर्क आहे. परंतु स्वतः लंके यांनी श्रीगोंदेत येऊन बैठका घ्याव्यात,. अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात लंके येथे येऊन चर्चा केली तर त्याचा परिणाम मतदानात दिसून येईल. महाविकास आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांनी अद्यापाही प्रचार संध सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्ते नेकमी कोणाला साध देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आहे, याचे नियोजन करूनच लोकसभेला मतदान करण्याच्या हालचाली सुरु आहेत. आगामी काळात साथ देणार असताल तरच आता साथ देऊन असा थेट प्रश्नच केला जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Post a Comment