नगर ः मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार या अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील, असा विश्वास खासदार डाॅ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकाही केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना डॉक्टर सुजय विखे म्हणाले, की मागील निवडणुकीच्या वेळी देखील शरद पवार म्हणाले होते, की मी माझ्या नातवाकडे पाहिलं, दुसऱ्या नातवाचा मला काही घेणं देणं नाही. त्यांच्या त्या वक्तव्याने जशी त्यावेळेस निवडणूक बदलली होती, तशी काल केलेल्या वक्तव्यामुळे देखील ही निवडणूक बदलणार आहे आणि मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार या अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील.
Post a Comment