नगर ः लोकसभा निवडणुकीची धामधूम बहरात आलेली असतानाच भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे.. अहमदनगरमध्ये भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. याच नाराजीतून शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात सुरु आहे.
जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास १०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, खासदार सुजय विखे यांना पुन्हा देण्यात आलेली लोकसभेची उमेदवारी राजीनाम्यामागील कारण असल्याची माहिती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी कळवली आहे. आज थोड्याच वेळात भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीकरीता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ ३७ उमेद्वारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जाग ही धोक्यात येऊ शकते. खासदार निवडून गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठयाप्रमाणात तुटला आहे, असे मत भाजप नेत्यांचे आहे.
Post a Comment