लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ताबेमारीचीच चर्चा...

नगर ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासावर कमी पण गुंडगिरीवरच जास्त बोलले जात आहे. मतदार संघात काय विकास करणार आहे, याबाबत महायुतीसह महाविकास आघाडीकडून भर देण्यात नाही. यामध्ये गुंडगिरीवर जास्त बोलले जात आहे. नेमके यांना विकास कारयाचा की गुंडगिरी हाच प्रश्न आता मतदारांना पडला आहे.


अहमदनगर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या मध्ये महायुतीसह महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे आरोप करताना आता एकमेकांनी काय कामे केली यावरून ते व्यक्तीगत पातळीवर हे आरोप येऊन पोहचलेले आहेत.

नेते मंडळी आरोप करून रान उठवूनदेत आहेत. हेच आरोप आता कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर केले जाऊ लागलेले आहे. नेत्यांनी केलेल्या आरोपाच्या व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहे. यावरून गावाृ-गावातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे ्प्रसंग घडू लागलेले आहेत.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा गुंडगिरीची झालेली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही गुंडगिरीचाच विषय पुढे येत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर गुंडगिरीचा आरोप करीत आहेत. परंतु नेमकी कोणाची गंडगिरी आहे, असाच सवाल आता केला जात आहे. 

दोन्ही पक्षात गुंडगिरी ्असेल तर आम्ही मतदरांनी नेमकं काय करायचं. तुमचे हे भाषण आम्ही मुलांना दाखवायची की नाही.. त्यातून मुलांनी काय घ्यायचं. असा थेट सवालच आता मतदारांमधून केला जात आहे. गुंडगिरी असेल तर सर्वांनी एकदिलाने तिचा नायनाट करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.

अहमदनगर शहरातील ताबेगिरीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत आलेला आहे. याच मुद्द्यावरून काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मोठा लढा उभारलेला आहे. त्यावेळी त्यांना इतर पक्षातील नेत्यांनी साथ दिली नाही. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ताबेगिरीचा मुद्दा पुढे आलेला आहे. 

तो तडीस नेणे गरजेचे आहे. यासाठी आता सर्वांनीच एकजूट करून नगर शहरात नेमके कोण ताबेगिरी करत आहे. त्या मागे कोण सूत्रधार आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. तरच या ताबेगिरीचा नायनाट होणार आहे. अन्यथा ही ताबेगिरी अशीच सुरु राहील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post