नगर ः अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. त्यामुळे विजयी होण्यासाठी सर्वच गोष्टींचा वापर केला जात आहे.
शिर्डीतील महायुतीच्या उमदेवाराला अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून मदत केली जात असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमकी व्यक्ती कोण अशीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
आजचा दुशमन उद्याच्या मित्र व आजचा मित्र उद्याचा दुश्मन होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी नाते संभाळून ठेवले पाहिजे. राजकीय क्षेत्रात नेते मंडळी स्टेजवरून एकमेकांना लाखोल्या वाहत असतात. मात्र सुख-दुःखात ही मंडळीने नेहमीच एकत्र येत असते. असे अनेक उदाहरणे जिल्ह्यात घडेलली आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. महायुतीच्या उमेदवाराने विकास कामे केली नसल्याचा आरोप मतदारांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातूनच त्यांना सुरवातीपासून विरोध आहे. त्यामुळे आणखीच नाराजी वाढत चालली आहे. ही नाराजी कमी करण्याऐवजी ती वाढत चालली असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
त्यातच आता शरद पवार गटाकडून त्यांना मदत केली जात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटातील एक निष्ठावंताकडून महायुतीच्या उमेदवाराला मदत केली जात आहे. महायुतीच्या यंत्रणेकडून शरद पवार गटाच्या उमेदवाराला अहमदनगर लोकसभा मतदार संघात मदत होत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्ते अजूनही आपण नेमका कोणाचा प्रचार करायचा या विवंचनेत आहेत.
Post a Comment