नगर तालुक्यातून खासदार लंके यांना मिळाले इतके लिड....

पारनेर : पारनेर मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावांमधून विखे यांच्यापेक्षा लंके यांना अवघे साडेचार हजारांचे लीड मिळाले असल्याचे निकालाच्या आकड्यातून समोर आले आहे. याच गावांनी विधानसभेला २३ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते. त्यामुळे लंके यांचे नगर तालुक्यातील मताधिक्य घटले आहे.


पिंपळगाव उजैनी, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, उदरमल, वाकोडी, चिचोंडी पाटील, अरणगाव, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, देवळगाव सिद्धी, वाळकी, बाबुर्डी घुमट, भोरवाडी, अस्तगाव, सोनेवाडी, देहरे, पिंपळगाव वाघा, नांदगाव, विळद, खारे कर्जुने, इसळक, वडगाव गुप्ता, नेप्ती, रुईछत्तीशी, गुंडेगाव या गावांमध्ये खा. निलेश लंके यांना मताधिक्य मिळाले.

गत विधानसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील परंतु पारनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमध्ये निलेश लंके यांना सुमारे २३ हजारांच्या पुढे मताधिक्य मिळाले होते. विधानभेला लंके यांच्या विजयात नगर तालुक्यातील गांवाचा मोलाचा वाटा होता.  

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावांमधून विखे यांच्यापेक्षा लंके यांना अवघे साडेचार हजारांचे लीड मिळाले असल्याचे निकालाच्या आकड्यातून समोर आले आहे. याच गावांनी विधानसभेला २३ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते. त्यामुळे लंके यांचे नगर तालुक्यातील मताधिक्य घटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post