नगर तालुक्यातून विखे यांना इतके लीड....

नगर : नगर तालुक्यात विखे-लंके यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचे पहावयास मिळाले. मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरुन नगर तालुक्यात विखे लीडवर असल्याचे दिसून येत आहे.


अहमदनगर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके व त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात जोरदार लढत झाली. 

या लढतीत विधानसभेच्या ३ मतदार संघात विभागलेल्या नगर तालुक्यातील १०९ गावांपैकी बहुतांशी गावांमध्ये विजयी उमेदवार निलेश लंके यांचे मताधिक्य रोखण्यात माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची यंत्रणा यशस्वी झाली आहे. 

नगर तालुक्यातील गावांमधून डॉ.सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले असल्याचे गावनिहाय मतांच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्डिले हे महाविकास आघाडीला सरस ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील बहुतांश गावांत विखे-लंके यांच्यात मोठी चुरस पहावयास मिळाली. तालुक्यातील बुर्‍हाणनगर, जेऊर, शेडी, पोखर्डी, पिंपळगाव माळवी, दरेवाडी, वडारवाडी, बाराबाभळी, पांगरमल, सोकेवाडी, निंबळक, घोसपुरी, सारोळा कासार, अकोळनेर, खंडाळा, चास, नवनागापूर, वडगाव गुप्ता या गावांत सुजय विखे पाटील यांना मताधिक्य मिळाले.

राहुरी विधानसभा मतदार संघात नगर तालुक्यातील एकूण २५ गावे आहेत. त्या २५ गावांमध्ये डॉ.सुजय विखे यांना एकूण २५ हजार ८४४ मते मिळाली. तर निलेश लंके यांना १८ हजार ७२९ मते मिळाली आहेत. या २५ गावांमध्ये विखे यांना ७ हजार ११५ मतांचे लीड मिळाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post