आदर्श व्यक्तिमत्व

नगर : नगर जिल्हा परिषदेतील सुभाष दशरथ कराळे 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने लेखाद्वारे शुभेच्छा देत आहे. माझे जि. प. सांगली येथून जि. प. अहमदनगर येथे आंतर जिल्हा बदली साठी प्रयत्न चालू होते.

त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे स्विय सहायक म्हणून सुभाषराव कराळे साहेब काम पाहत होते. त्यावेळी माझे वडील व मी वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या भेटीसाठी जात होतो  मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांची भेट घालून देण्यासाठी कराळे साहेब मला, वडिलांना व इतरांना सहकार्य करत होते. पहिली वडिलांची व नंतर माझी ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर  मैत्रीत होत गेले.

आजही ते खुशाली विचारत असताना वडिलांची सुद्धा सतत तब्येतीची चौकशी करत असतात माझी बदली होऊन मी जिल्हा परिषद अहमदनगर येथे सेवेत रुजू झाल्यानंतर नेहमी आम्ही एकमेकांना भेटायचो. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये मी काम करायला सुरुवात केली.संघटनेचे मोर्चे, आंदोलनात एकत्र सहभागी होवू लागलो.कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. 

वरिष्ठांशी त्यांचे चांगले संबंध असायचे त्यामुळे अनेक प्रश्न सहज सोडविले जायचे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील ते दुवा बनत. कर्मचाऱ्यांचे कामे मार्गी लावताना निरपेक्षपणे काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.  अभ्यासू,शांत, संयमी स्वभाव त्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये ते लोकप्रिय होत गेले. जिल्हा परिषदेच्या विविध संघटना यांचे समान प्रश्नावर सर्व संघटनांना एकत्र आणण्यासाठी श्री कराळे साहेब यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायची. 

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कारभार चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जायला लागला होता. ही गोष्ट लक्षात येताच सर्व सभासद एकत्र आले व श्री कराळे साहेबांकडे गेले व त्याचे नेतृत्व कराळे साहेबांना करण्याचा आग्रह करू लागले. कराळे साहेबांनी सर्व सभासदांच्या विनंतीचा मान राखून त्यावेळी पॅनलचे नेतृत्व स्वीकारले व तदनंतर झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये श्री कराळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वचे सर्व संचालक मोठ्या फरकाच्या मताधिक्याने निवडून आले.

मी साहेबांच्या नेतृत्वाखाली सोसायटीमध्ये संचालक व चेअरमन म्हणून काम केले. कराळे साहेबांनी संपूर्ण सोसायटीच्या कारभाराचा अभ्यास केला व नवीन नवीन योजना राबविण्यास सुरुवात केली तर सभासदांचा व संचालकांचा एकमुखी पाठिंबा त्यांच्या नेतृत्वाला मिळाला. अल्पावधीतच सोसायटी पुन्हा प्रगतीपथावर आली.अभ्यासपूर्ण पारदर्शक, काटकसरीने सोसायटीचा कारभार केला. सभासदांचे हिताचे निर्णय घेऊन सोसायटीची आर्थिक स्थिती भक्कम झाली, सोसायटीच्या भव्य इमारतीची उभारणी कराळे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली.सोसायटी च्या जडणघडणीत व प्रगती मध्ये कराळे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. 

कराळे साहेबांच्या सुस्वभावामुळे त्यांचा प्रचंड मोठा मित्रपरिवार आहे. कराळे साहेबांचे वडील जिल्हा परिषद कर्मचारी होते त्यांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते अनुकंपाद्वारे कराळे साहेबांचा प्रवेश जिल्हा परिषदेमध्ये झाला. त्यांनी जिल्हा परिषदेत अनेक पदे भूषविली संघटना व सोसायटीमध्ये त्यांनी सर्व महत्त्वाची पदे भूषवली त्यांच्यामुळे त्या पदांना प्रतिष्ठा मिळाली. मानवी मूल्याचे भान ठेवून समाजामध्ये काम करणारा एक एक व्यक्ती समाजाचा फार मोठा आधार असतो. 

त्याप्रमाणे कराळे साहेब सुद्धा अहमदनगर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा फार मोठा आधार होते. कराळे साहेब जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेळोवेळी होणाऱ्या प्रशासकीय प्रशिक्षणामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करायचे त्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी प्रशासकीय दृष्ट्या तयार झाले. त्यामुळे आजही अनेक कर्मचारी व अधिकारी प्रशासनात कराळे साहेबांचा सल्ला व मार्गदर्शन घेतात त्यामुळे अनेकजण त्यांना गुरु मानतात.  कराळे साहेब 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. कराळे साहेबांना सेवानिवृत्तीनंतरच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व त्यांचे भावी आयुष्य आरोग्यदायी जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

 - सुरेश विठ्ठलराव पाटेकर, सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला जिल्हा नाशिक तथा माजी चेअरमन, अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था ,अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post