नेवाशातून सुजय विखे यांना संधी द्या... एकमत नसल्याने कार्यकर्त्यांची मागणी

नेवासा ः नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये दुफळी पडलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिनेच बाकी असताना उमेदवार कोण राहणार याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. भाजपअंतर्गत सध्या गटबाजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी खासदार सुजय विखे यांना नेवाशातून संधी द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.


नेवासे विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सचिन देसर्डा, ऋषीकेश शेटे यांची नावे सध्या चर्चेत आहे. या तालुक्यातील नेत्यांच्या नावावर आता तालुक्यात एकमत होत नसल्याने अडचणी वाढलेल्या आहेत.
या नेत्यांच्या नावाबरोबरच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्या अनुषंगाने कर्डिले समर्थकांकडून तालुक्यात पडताळणी झालेली आहे. पण या हालचाली सध्या संथ होत असल्या तरी त्याविषयी चर्चा सध्या तालुक्यात जोरदार सुरु आहे. कर्डिलेही उभे राहिले तरी या मतदारसंघातील निवडूक चुरशीची होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

नुकत्याच लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे पराभूत झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे पुर्नवसन होणे गरजेचे आहे. नेवाशात भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक नेत्यांविषयी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आलेले नाही. त्याचा फटका मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला बसलेला आहे. तसचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराल लीड भेटलेले नाही. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला लीड भेटलेले आहे. त्यामुळे भाजपला नेवासे विधानसभा निवडणुकीत चांगेल वातावरण आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला निवडून येण्यासाठी वातावरण चांगले आहे. त्यामुळे येथे सक्षम उमेदवारीची गरज आहे.

नेवाशातील जागा भाजपच्या गोटात येण्यासाठी या मतदरासंघातून माजी खासदार सुजय विखे यांना नेवाशातून संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली जाणार आहे. या संदर्भात काहीजण पक्षाच्या नेत्यांना पत्र देऊन साकडे घालणार असल्याची चर्चा सध्या भाजप वर्तुळात सुरु आहे. 

लोकसभेला विखे- गडाख लढत व्हावी, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते. ही लढत चुरशीची होणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी नेवाशात इतर उमेदवार देण्याऐवजी विखे यांनाच संधीद्यावी, अशी मागणी होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post