नगर ः लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतमोजणीच्या दरम्यान, मतांच्या आकड्यांचा खेळ करण्यात आला. हा खेळ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आहे. हा चुकीच्या आकड्यांचा खेळ नेमका कोणी व कशासाठी केला याचा उलगडा मात्र झाला नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. ़
लोकसभेच्या निकालानंतर माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचशी संवाद साधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबतच चर्चा सुरु होती. या चर्चेत निकालाच्या दिवशी जो मतांच्या आकड्याचा खेळ झाला, तो आकड्यांचा खेळ कोणी व कशासाठी केला, यातून नेमके काय साध्य करायचे होते, या विषयची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु होती. चुकीचे आकडे नेमके कोठून येत होते, ते लगेच समाज माध्यमावर कसे व्हायरल होत होते, याचा शोध घेणे अपेक्षीत आहे. परंतु त्यावर कोणीच काही बोलले नाही.
चुकीचे मतांचे आकडे समाज माध्यमावर व्हायरल करून एक प्रकारे उमेदवार व पक्षाची खिल्ली उडविण्याचे काम झालेले आहे. पक्षातील काही विघ्नसंतोषींनी हे काम केले आहे. अशा विघ्नसंतोषी लोकांचा पडदाफाश करणे गरजेचे आहे. त्यामुळे चुकीचे आकडे नेमके कोणी व कशासाठी व्हायरलं केले, याचा शोध भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा, अशी मागणी होत आहे.
Post a Comment