नगर ः कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून खासदार सुजय विखे यांना मताधिक्य मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ती शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. आगामी काळात विखे समर्थक कर्जत-जामखेडबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जत-जामखेड तालुक्याची विखे यांच्यावर नाराजी होती. ही नाराजी या तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांनी नेहमीच व्यक्त केली होती. या वेळी लोकसभेसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील नेत्याला उमेदवारी मिळावी, अशी सर्वांची इच्छा होती. विशेष म्हणजे येथील नेत्यांनीही ती अनेकदा व्यक्त होती.
जामखेडमधीस नेत्यांनीही लोकसभेला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु पक्षाने सुजय विखे यांना उमेदवारी देऊन सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे सूचित केले होते. विखे यांनीही नाराजांची नाराजी दूर केली होती. मात्र नेत्यांची नाराजी दूर झाली होती. मात्र कार्यकर्त्यांची नाराजी दूर झालेली नव्हती.
कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सर्वाधिक फटका या वेळी खासदार सुजय विखे यांना बसलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून लीड मिळण्याऐवजी लीडमध्ये घट होऊन विरोधी उमेदवार नीलेश लंके यांना सर्वाधिक लीड भेटले. या लीडमुळेच लंके विजयी झालेले आहेत. हे लीड फक्त सुजय विखे यांच्या नाराजीतून मिळालेले आहे.
या मतदारसंघातून विखे यांना लीड भेटणार नाही, यावर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु होती. काहींनी त्यावर पैजाही लावल्या होत्या. मात्र या तालुक्यातून विखे यांना लीड भेटलेच नाही. कोण काम करणार व कोण करणार नाही, या विषयी कार्यकर्ते उघड बोलत होते. तंतोतंत तसेच खरे ठरलेले आहे. हा पराभव फक्त एकट्या विखे यांचा नसून संपूर्ण भाजपचा आहे, हेच मात्र संबंधित विसरले होते.
मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या जिरवाजिरवीच्या राजकारणाचा वचपा या वेळी लोकसभा निवडणुकीत झालेला आहे. मागील जिरवाजिरवीचा डाव या वेळी टाकून चांगली जिरली आहे. हा प्रकार पक्षाच्या हिताच्या दृष्टीने घातक आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
Post a Comment