नगर : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी रविवार 9 जून 2024 रोजी होणार आहे. देशभरातील अनेक मान्यवरांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे.
भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक प्रा भानुदास बेरड यांना शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Post a Comment