नगर ः दूध दरवाढीसह कांदा प्रश्नावर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले जनआक्रोश आंदोलन सुरू तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास तशी घोषणा करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूधदरासह कांदा व इतर प्रश्नांवर उपोषण सुरू केल्याचा आज (रविवारी) तिसरा होता. प्रशासन व सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे आंदोलकर्ते आक्रमक झाले होत होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्ते खासदार नीलेश लंके व यांच्यासह आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
शुक्रवारपासून हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. पहिले दोन दिवस दिवस कोणीच आंदोलनस्थळाकडे प्रशासनाचे न आल्याने आज तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्ते संतप्त होत होते. खासदार लंके यांनीही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. याच वेळी मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
या वेळी त्यांनी आंदोलनाची स्थिती जाणून घेत आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संदेश कार्ले, राजेंद्र फाळके त्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर काही वेळातच विखे आंदोलनस्थळी आले. त्यावेळी आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सरकारची भूमिका विषद केली.
त्यानंतर सर्वानुमते आंदोलन मागे घेण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. दिलेले आश्वासन जर पाळले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन स्थगित होण्यात विखे यांच्यासह जयंत पाटील यांनी आपली भूमिका बजावली.
दरम्यान आंदोलन स्थगित झाल्यानंतर सर्वच आंदोलनकर्त्यांनी जेवानाचा आस्वाद घेतला. पारनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून स्वयंपाक करून आंदोलनकर्त्यांना जेवण आणले होते. आंदोलन स्थगित झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलन कर्त्यांबरोबरच जेवणाचा आस्वाद घेतला. खाली बसून जारचा टेबल बसवून त्यांनी जेवणाचा अस्वाद घेतला. त्यांच्या या जेवणाची आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा रंगली होती.
Post a Comment