व्यवस्थापकीय संचालकांकडून धुळ्याचे विभागनियंत्रकांचे अभिनंदन

धुळे : उल्लेखनीय काम केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेऊन नेहमीच कौतुक केले जाते.  असेच कौतुकास्पद काम धुळ्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे, शहादा व शिरपूर आगारांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.


संदर्भित परिपत्रकान्वये रा.प. महामंडळातील विभाग/आगार यांचे विविध घटकांचे फलनिष्पत्तीमध्ये भौतिक व आर्थिक मापदंड विचारात घेऊन श्रेणीकरण करण्यात येते. संदर्भित पत्र क्र. १ अन्वये जुलै-२०२४ मधील घटकांच्या फलनिष्पत्तीनुसार घटकांचे श्रेणीकरण केले आहे. त्यानुसार आपल्या विभागास एकूण ७८ गुण प्राप्त झाले आहे. 

आपल्या विभागास माहे जुलै-२०२४ महिन्यात महामंडळ स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच धुळे, शहादा व शिरपूर आगार आगारांच्या अ वर्गवारीमध्ये अनुक्रमे ९२, ९० व ८७ गुणांसह प्रथम तीन क्रमांकावर आहे. तसेच अक्कलकुवा आगार आगारांच्या ब वर्गवारीमध्ये ८८ गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहे.

ही कामगिरी महामंडळासाठी अभिमानास्पद आहे. यापुढेही आपणाकडून अशीच कामगिरी येणार्या कालावधीमध्ये होईल, अशी अपेक्षा आहे. सदर उत्कृष्ट कामगिरीबाबत आपले व आपल्या विभागातील सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post