नेवासा : नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख आता तालुक्यातील विविध गावात जाऊन घोंगडी बैठका घेत आहेत. या बैठकांच्या माधयमातून त्यांनी सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. परंतु ते पक्ष बांधणी करून आपला राजकीय मार्ग पक्का करीत असून सामजिक प्रश्न वर्षानुवर्षे कायम राहात आहे.
नेवासा तालुक्यातील काही गावात रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे अनेक सुपिक जमिनी पडीक पडलेल्या आहेत. काही शिवरस्त्यांवर अतिक्रमणे झालेले आहेत. त्यामुळेही अनेक शेतक्यांच्या जमिनी पडीक आहेत. या शेतीमध्ये हिरवाई होण्यात रस्त्याची आडकाठी आहे.
याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केलेेले आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणे वाढत गेलेली आहे. ही या अतिक्रमणे विविध पक्षाच्या नेत्यांची असल्याचे उघड होत आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची अतिक्रमणे आहेत. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याबाबत अनेकांनीससाणाकडे तक्रार केल्या असून त्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
या प्रश्न आमदार शंकरराव गडाख यांनी आता पुढाकार घेऊन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
नेवासा नगरपंचायत सरकारी जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलेली आहे. नव्याने काही अतिक्रमणे सुरू झालेले आहे. याकडे नगरपंचायतच्या प्रशासकाचे दुर्लक्ष झालेले आहे.
याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासकांकडे तक्रार केल्या आहेत, परंतु त्याकडे प्रशासकाने दुर्लक्ष केलेले आहे. परंतु त्यामुळे शासकीय जागांवरील अतिक्रमण वाढत चालली आहे.
आगामी काळात एकाचे पाहून दुसर्याने अतिक्रमणे सुरु राहिल्यास नेवाशात सरकारी जागाच राहणार नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. याबाबत आता प्रशासकांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
आमदार शंकराव गडाख यांनी नगरपंचायतची घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
.jpeg)
Post a Comment