झेडपीतील काही कर्मचारी कार्यालयाच्या खिडक्यांमधून धुतात अन् करतात गुळण्या

नगर :  जिल्हा परिषदेतील काही कर्मचार्यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडत आहे. येथील काही कर्मचारी जितके शिकलेेले आहेत. तितकेच त्यांच्या वर्तनुकीतून हुकलेले असल्याचे स्पष्ट होत आहे. 


जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी मावा गायछाप सारखे पदार्थ खाऊन इमारतीत वाटेल तेथे थुंकत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची विद्रुपीकरण होत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. 

काहीजणांनी दुपारच्या सुटीत जेवनाच्या वेळेस खिडकीतून हात धुन्यास सुरवात केलेली आहे. या त्यांच्या सवयीने अनेकांच्या अंगावर पाणी पडूनही या कर्मचार्यांच्या सवयी बंद झालेल्या नाहीत.

याबाबत प्रशासनाकडे तक्रारी झालेल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या पाठी मागील बाजूस असलेल्या खिडक्यांमधून मावा गुटख्याच्या पिचकार्यां मारल्या जात आहेत.  

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार जिल्हा परिषदेत सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पिचकारीने जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी रंगलेले आहेत. तरीही कर्मचाऱ्यांच्या पिचकारीची सवयी अद्याप गेलेल्या नाहीत.

जिल्हा परिषदेत गुटखा व मावा खाऊन थुंकणार्यांवर शासकीय इमारतीचे विद्रोपीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे आदींनुसार आधार घेऊन दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. तू प्रशासन फक्त बघ्यायची भूमिका घेत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post