लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांवर परिणाम...

नागपूर : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये वेळेवर अनुदान दिले जाईल याची खात्री नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. 


नागपूरमध्ये रविवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांमधील १८ ते ६५ या वयोगटातील स्त्रियांसाठी ही योजना अलिकडेच सुरू केली आहे. 

त्याअंतर्गत दरमहा १,५०० रुपये दिले जातात. यामुळे तिजोरीतून वर्षाला जवळपास ४६ हजार कोटी खर्च होणार आहेत. योजनेच्या लाभार्थींची संख्या सुमारे अडीच कोटी आहे. याबाबत गडकरींनी गुंतवणुकीसाठी पूर्णपणे सरकारवर अवलंबून राहू नये असे आवाहन जनतेला केले. 

गडकरींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post