नगर ः जामखेडमधील शरदचंद्र पवार गटातील मधुकर राळेभात भाजपमध्ये गेल्याने जामखेड तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसणार आहे. जामखेडप्रमाणेच कर्जत तालुक्यातील शरद पवार गटातील एक नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरु असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार रोहित पवार यांच्या विजयात मागील निवडणुकीत मधुकर राळेभात यांचा मोठा वाटा होता. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत राळेभात यांनी शरद पवार गटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या भाजमध्ये जाण्याने भाजपची ताकद वाढलेली आहे. त्याचा फायदा आगामी काळात भाजपच्या उमेदवारांना होणार आहे.
राळेभात यांच्या सारखाच कर्जतमधील मोठा नेता भाजपच्या वाटेवर आहे. लवकच हा नेता शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोडचिठ्ठीसह प्रवेश कार्यक्रम रखडला असल्याची चर्चा सध्या भाजप गोटात सुरु आहे.
त्या नेत्याची पूर्ण तयारी सुरु झालेली आहे. परंतु त्या नेत्याची शरद पवार गटातील नेत्यांकडून मनधरणी सुरु झालेली आहे. त्यामुळे तो नेता बाहेर पडणार की पक्षातच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. विरोधी गटातील लोकांना बरोबर घेतले जाते.
काम करताना मित्र पक्षातील नेत्यांनाही अंधारात ठेवले जात आहे. अशी चर्चा सध्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांची सुरु आहे. दबक्या आवाजातील चर्चा आता कार्यकर्ते उघडपणे करू लागलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात त्याचा फटका पक्षासह आमदार रोहित पवार यांना बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष वेधले आहे.
.jpeg)
Post a Comment