एका स्वयंभू नेत्याला परराज्यात अटकेची चर्चा

नगर : जिल्ह्यातील एका भावी आमदाराला परराज्यातील पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला आहे. त्याची राजकारणाची नशाच उतरली असल्याची चर्चा झालेली आहे. 


जिल्ह्यातील एक भावी आमदार बाहेरील राज्यात गेले होते. याच वेळी त्यांच्य वाहनात दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. बाहेरील राज्यातील पोलिसांनी त्या भावी आमदाराला हिसका दाखविला आहे. त्यानंतर या भावी आमदाराची त्रेधातिरपीट उडाली. 

आपण नगर जिल्ह्यातील  नेता असल्याचे पोलिसांना त्या भावी आमदाराने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंकर नेत्याने राज्यातील एका बड्या नेत्याच्या स्वीयसहाय्यकाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी हालचाली करू त्या नेत्याची सुटका केली.

जिल्ह्यात नेहमीच व्हीआयपी म्हणून मिरवणार्या नेत्याची फजिती झाल्याच्या चर्चेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा भावी आमदार कोन अशी चर्चा सर्वाधिक श्रीगोंद्यात सुरू आहे.

जिल्ह्यातील एक नेता बाहेरील राज्यात गेला होता पण तेथे दारुबंदी असल्याने या राज्यात दारू बाबत कठोर कायदे असताना देखील या महाशयांच्या  वाहनात दारू आढळून आली. त्यानंतर  पोलिसांनी त्यांना तत्काळ वाहनासह ताब्यात घेतले. नेत्याने महाराष्ट्रातील एकानेत्याच्या स्वीयसहाय्यकाच्या मदतीने त्या भावी आमदाराची सुटका झाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post