नेवासे ः धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नेवासा फाटा येथे समाज बांधवांचे नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. गुरुवारी (ता. 26) सकाळी आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला अखेरचा जय मल्हार असे चिठ्ठीत नमूद करून गायब झालेले दोन आंदोलक तब्बल 18 तासानंतर ते मिळून आलेले आहे. नदीच्या काठी झोपलेल्या अवस्थेत ते आढळून आलेले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
या आंदोेलकातील एकाची कार तसेच दोघांच्याही चपला अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवरासंगम येथील नदीच्या पुलावर आढळल्या होत्या. त्यामुले प्रशानसाने दिवसभर त्यांचा गोदावीर नदी पात्रात शोध घेतला होता. मात्र ते रात्रीपर्यंत मिळून आले नव्हते. सकाळी पुन्हा या दोन आंदोलकांचा पोलिस शोध घेत होतो. हे दोन्ही आंदोलक मासे मारी करणाऱ्यांच्या छोट्या होडीवर झोपलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, त्या दोन आंदोलकांनी जलसमाधी घेतल्याची वार्ता समजताच सर्व समाज बांधवांनी प्रवरासंगम येथे येत रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्या दोघांनाचा पोलिसांनी रात्री उशीपर्यंत शोध घेतला. मात्र ते मिळून आले. त्यामुळे समाज बांधवांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
समाज बांधवांचा रोष पहातो पोलिसांकडून तपासाची यंत्रणा वेगवान केली होती. परंतु ते रात्री मिळून न आल्याने प्रशासन हतबल झाले होते. मात्र अंधार पडल्यानंतरही शोध कार्य सुरुच होते. सकाळी दिवस उजाडताच पुन्हा शोध कार्य पोलिसांनी सुरु केले. त्यांच्या शोध कार्याला तब्बल 18 तासांनी यश आले. ते दोघेही जीवंत आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Post a Comment